जि.प.शाळा 2 जत येथे पहिल्या दिवशी वृक्षारोपण

जत,संकेत टाइम्स : जिल्हा परिषद शाळा नंबर दोन याठिकाणी शाळा शुभारंभ व नवागत मुलांचे स्वागत करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गटशिक्षणाधिकारी दिनकरराव खरात व विस्तार अधिकारी टी.एल.गवारी यांच्या हस्ते करण्यात आले.उपस्थित इयत्ता पहिलीच्या दोन मुलांना वही पेन व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना दिनकर खरात म्हणाले की, शिक्षकांनी मुलाच्या प्रगतीकडे लक्ष देऊन ऑनलाइन, ऑफलाइन ,व्हाट्स , गुगल मिट विविध साधनांचा वापर करून मुलांना शिक्षण द्यावे पालकांनी मुलांच्याकडे लक्ष द्यावे असा सल्ला दिला.
    शालेय परिसरात गट शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते विविध फळ फुले झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी शाळेतील पालक वर्ग उपस्थित होते 
          यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिगंबर सावंत यांनी केले यावेळी मुख्याध्यापक जैनुदिन नदाफ,दिगंबर सावंत,अलका गायकवाड, जान्हवी भोसले,सुनिता इरकर,श्रुतिका मडवले,कल्पना माने इ पालक उपस्थित होते.


जत येथील जिल्हा परिषद शाळा नं.2 मध्ये पहिल्या दिवशी वर्षारोपण करण्यात आले.