संजय गांधी,श्रावणबाळ योजनेत 152 लाभार्थी पात्र ; नाना शिंदे

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील संजय गांधी योजना अंतर्गत 110 व श्रावण बाळ योजनेतून 42 लाभार्थीना लाभ देण्यात आला.20 लाभार्थी अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष, काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे यांनी दिली.संजय गांधी योजना व श्रावण लाभार्थ्यांना लाभ बाळ योजनेची बैठक समितीचे अध्यक्ष, काँग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.बैठकीस जत तहसिलदार सचिन पाटील,सदस्य सिध्दू शिरशाड, उत्तम चव्हाण, राम पाटील,गणेश गिडे,विजय चव्हाण, अनिल पवार,गटविकास अधिकारी धरणगुतीकर,
नायब तहसीलदार संजय पवार उपस्थित होते.