15 व्या वित्त आयोगातून वीज बील भरणे,ग्रामपंचायतीने आत्महत्या करण्यासारखे | आम्ही विजबिले भरणार नाही; संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज‌ पाटील यांनी केले स्पष्ट

जत,संकेत टाइम्स : शासनाच्या बिल न भरण्याच्या नाकर्तेपणा मुळे अनेक‌ गावे अंधारात गेली आहे.आता 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून विज बिले भरण्याचा फतवा काढला जात आहे,अशा भूमिकेने 15 वा वित्त आयोग नीधीचा खेळखंडोबा करुन टाकला आहे,हे बिल भरणे म्हणजे ग्रामपंचायतची आत्महत्या केल्याचा प्रकार आहे,अशी भूमिका संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील यांनी‌ दैनिक संकेत टाइम्सशी बोलताना व्यक्त केली.


सरकारने नवे आदेश काढत,नळ कनेक्शन,जि प शाळा व अंगणवाडी नळ कनेक्शन,कोरोना आपत्ती खर्च, बंधीत अबंधीत कधी 50 टक्के तर कधी 60 टक्के, आपले सरकार सेवा केंद्र अँडव्हास पेमेंट आणी आता स्ट्रीटलाईट वीजबील भरणा अशी,रोज एक नवीन परिपत्रक येत आहेत.
एवढचं करायचे होते तर बालसभा,महिलासभा,गण प्रशिक्षण,ग्रामसभा ,आराखडा,प्लँन प्लस असा कशासाठी फार्स केला.


यामुळे सरपंच व ग्रामसेवकांची दमछाक करुन टाकली आहे.15 वा वित्त आयोग चा सर्व निधी पीएफएमएस प्रणालीद्वारेच खर्च करणे बंधनकारक असताना आपले सरकार सेवा केंद्राचे पैसे चेक ने कसे काय चालतात मग?, शासनाच्या पूर्ण लक्षात आले आहे की, एक एक निर्णय ग्रामपंचायतीवर लादून अंमलबजावणी करणे भाग पडायचे असाच स्ट्रीट लाईटचा निर्णय लादून ग्रामपंचायतचा कारभार बंद पाडणेचा डाव आहे.त्यामुळे काहीही झाले तरी ग्रामपंचायती मधून स्ट्रीट लाईटचे बिल भरू नका ते शासनाने भरणे क्रमप्राप्त आहे,आणि गावात जो अंधार झाला आहे.


तो शासनाचा नाकर्तेपणा आहे. त्यास सरपंच ग्रामपंचायत जबाबदार नाही,एक वेळ गावाला अंधार परवडेल पण बिल भरणे म्हणजे ग्रामपंचायतची आत्महत्या केल्यासारखे होईल आणि त्यास आपण गावकारभारी जबाबदार राहू, शासनाचा सर्व ग्रामपंचायत कामकाजात चाललेला अन्याय राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी त्वरित बंद करा अन्यथा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या वतीने राज्य भर आंदोलन करू, वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई लढू मात्र ग्रामपंचायतीची स्वायत्ता आबाधित ठेवू,असेही पाटील म्हणाले.