पोलीसावर हल्ला,तिकोंडीच्या 12 जणांना अटक

जत,संकेत टाइम्स : तिकोंडी ता.जत येथे करेवाडी व तिंकोडीतील दोन गटाच्या‌ भांडणाच्या तयारीत जमलेल्या जमावाला पांगविणाऱ्या पोलीस कर्मचारी नागेश खरात,होमगार्ड सचिन कोळेकर यांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी 12 जणांना अटक केली आहे.तर अन्य तिघे फरारी झाले आहेत.
अधिक माहिती अशी, तिकोंडी येथे करेवाडी व तिकोंडीतील दोन गटात जून्या वादावरून हाणामारी सुरू होती.


जवळपास 100 रावर जमाव जमला होता.यांची माहिती संख बीटच्या पोलीसांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला.मात्र जमावातील काहीजणांनी थेट पोलीस कर्मचारी खरात व होमगार्ड कोळेकर यांच्यावर लोंखडी गजाने हल्ला करून जखमी केले होते. याप्रकरणी उमदी पोलीसात शासकीय कर्मचाऱ्यां मारहाण,शासकीय कामात अडथळा याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.


त्याप्रकरणी मुताप्पा वडियार,तुकाराम बेंळूखे,आंबाना कोळी,सुनिल अमृत्तहट्टी,विठ्ठल आवटी,उमेश अमृत्तहट्टी,तम्माराया अमृत्तहट्टी,अनंत अमृत्तहट्टी,मदगोडा हिंचगिरी,बसू यल्लगार,अशोक यल्लगार,सर्व जण रा.तिकोंडी यांना अटक केली आहे. अन्य तिघेजण फरारी आहेत.त्याचा शोध सुरू आहे.