कोरोना पहिल्या लाटेत लढलेला शहिद योध्दा ; नानासाहेब कोरे | Corona a martyred warrior fighting in the first wave; Nanasaheb Kore

0



कोरोनाच्या पहिल्या लाटेत‌ जिवाची बाजी लावून सामाजिक जबाबदारीचं भान ठेऊन कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आपला जीवाची ज्यांनी बाजी लावत अशा डफळापूर येथील कोरोना योध्दा नानासाहेब कोरे यांचा आज (12 मे ) प्रथम स्मृतिदिन आहे म्हणून त्यांच्या आठवणींना दिला हा उजाळा..

डफळापूर येथील कोळीवस्ती येथे शिक्षक असणारे नानासाहेब कोरे यांना कोरोनाच्या पहिल्या विक्राळ लाटेत कर्नाटक महाराष्ट्र हद्द‌ असणाऱ्या शिंगणापूर फाटा येथे चेकपोस्टवर पोलीसासोबत मदतनीस म्हणून कर्तव्य बजावत‌ असताना

12 मे 2020 कर्नाटकातून आलेल्या ट्रक तपासणी न करताच भरधाव पळवून नेहल्याने त्यांचा पाठलाग ‌करत‌ असताना डफळापूर स्टँड जवळ भरधाव ट्रक चालकाने अंगावर घातल्याने सदर शिक्षकाचा मृत्यू झाला होता.






कोरोनाच्या आक्राळविक्राळ पहिल्या लाटेत देशभक्ती बजावत असलेल्या एका कर्तव्यदक्ष शिक्षकांला जीव गमवावा लागला होता.

शाळेला आपले दैवत्य‌ दिलेल्या जबाबदारीला कर्त्तव्य समजणारे नानासाहेब कोरे कोरोना योध्दे ठरले आहेत.अगदी संकट काळात त्यांनी बजावलेली कर्तव्यदक्षता आजही स्मरणात राहणारी आहे.

उच्चशिक्षित भाऊ पत्नी,एक मुलगा,शेतकरी वडील,आई,पोस्टात नोकरी करणारे चुलते असा हसता खेळता परिवार असलेले नानासाहेब यांच्या आकस्मिक जाण्याने कुंटुबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 






कायम आपली जबाबदारी मनापासून पुर्ण करणे असा पांयडा नानासाहेब कोरे या शिक्षकांचा होता. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी सर्वोत्तम शिक्षण घेतला पाहिजे यासाठी त्यांचे कष्ठाक्षणाने लक्ष असायचे,वडिलाच्या इच्छेखातर शिक्षकांची नोकरी पत्करलेल्या महाराष्ट्र, केंद्रीय लोकसेवाचा अभ्यास करणाऱ्या शिक्षकांचा दुर्देवाने ओढावलेला मुत्यू कधीही विसरणारा नाही.

देशातील कोरोना योध्दाच्या यादीत कागदी आमरत्व मिळालेल्या नानासाहेब कोरे‌ या शहिद योध्दांचे कुंटुबिय आजही शासकीय मदतीपासून वचिंत‌ आहे.खऱ्या अर्थांने आजच्या स्मृतीदिनी त्यांच्या पश्चात पत्नी,मुलासाठी शासन स्तरावर विचार व्हावा..हिच खरी श्रंध्दाजली ठरेल.



Rate Card





आश्वासनाची पुर्तता नाही


कोरोना योध्दे नानासाहेब कोरे यांच्या मुत्यू वेळी वरिष्ठ अधिकारी, नेते,शिक्षक नेत्यांनी मदतीच्या घोषणा करत‌ आश्वासने दिली होती. मात्र अपवाद वगळता वर्षानंतरही त्या आश्वासनाची पुर्तता झालेली नाही.






कुंटुबिय आजही मदतीपासून वचिंत


नानासाहेब कोरे यांचा कोरोना ड्यूटी बजावत‌ असताना ट्रक अंगावर घातल्याने मुत्यू झाला होता.कोरोनात कर्तव्यात बजावत असताना मुत्यू झाल्यास केंद्र राज्य शासनाकडून कोविड योध्दा म्हणून विम्यासह,अन्य मदतीच्या घोषणा केल्या  होत्या,मात्र नानासाहेब कोरे या योध्दाचा मुत्यू वर्ष होऊनही कुंटुंबिय‌ शासकीय मदतीपासून वचिंत आहे.


शंब्दाकन ; राजू माळी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.