कोरोना बाधित रूग्णांना शिक्के मारा, त्यांची यादी ग्रामपंचायतींच्या बोर्डावर लावा ; पालकमंत्री

सांगली : कोरोनाची परिस्थिती अधिकच भयावह होत असल्याने ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होणे हे महत्वाचे आहे. जिल्ह्यातील सध्याची ऑक्सिजनची मागणी 23 टनावरुन 40 टनापर्यंत पोहचली आहे. ऑक्सिजनची 40 टनाची मागणी पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, आटपाडी तालुक्यात कोरोनाबाधीतांची संख्या मोठ्याप्रमाणात असून मृत्युदरही जास्त आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने अधिक काळजीपुर्वक व गतीने कामकाज करावे.
आटपाडी शहरात सुविधा कोरोना रुग्णालय सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे व्हेंटीलेटर तातडीने उपलब्ध करुन देण्यात येतील. हे व्हेंटीलेटर प्राप्त होताच सुविधा कोविड रुग्णालय तातडीने सुरु करावे. कोविड रुग्णालयांनी ऑक्सिजनची मागणी एक दिवस ऑक्सिजन पुरेल इतका शिल्लक असताना प्रशासनकडे करावी. त्यामुळे रुग्णांलयांना नियमितपणे  ऑक्सिजन पुरवठा होईल.

            ज्या गावात 15 पेक्षा जास्त रूग्ण आहेत त्या गावातील निर्बंध अधिक कडक करावेत. सक्तीने जनता कर्फ्यू लागू करा. कोरोना बाधित रूग्णांना शिक्के मारा व त्यांची यादी ग्रामपंचायतींच्या बोर्डावर प्रसिध्द करावी. कोरोना बाधित रूग्ण बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना विविध शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत त्या ठिकाणी पाठवावे. गावातील शाळा निश्चित करून बाधितांना शाळेत ठेवावे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जे निर्बंध घातले आहेत त्याला नागरिकांनी सहकार्य करावे. निर्बंधांचे कठोर पालन होण्यासाठी पोलीसानींही गस्त वाढवावी. कोरोनाबाधीत रुग्णांनी इतरांना कोरोनाबाधीत करु नये यासाठी स्वत:ची काळजी घेण्याबरोबरच होम आयसोलेशन व्हावे. आणि इतरांना बाधीत होण्यापासून वाचवावे असे अवाहन त्यांनी यावेळी केले.जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशिल ; पालकमंत्री


सांगली : कोरोनाची परिस्थिती अधिकच भयावह होत असल्याने ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होणे हे महत्वाचे आहे. जिल्ह्यातील सध्याची ऑक्सिजनची मागणी 23 टनावरुन 40 टनापर्यंत पोहचली आहे. ऑक्सिजनची 40 टनाची मागणी पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, आटपाडी तालुक्यात कोरोनाबाधीतांची संख्या मोठ्याप्रमाणात असून मृत्युदरही जास्त आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने अधिक काळजीपुर्वक व गतीने कामकाज करावे. आटपाडी शहरात सुविधा कोरोना रुग्णालय सुरु करण्यासाठी आवश्यक असणारे व्हेंटीलेटर तातडीने उपलब्ध करुन देण्यात येतील. हे व्हेंटीलेटर प्राप्त होताच सुविधा कोविड रुग्णालय तातडीने सुरु करावे. कोविड रुग्णालयांनी ऑक्सिजनची मागणी एक दिवस ऑक्सिजन पुरेल इतका शिल्लक असताना प्रशासनकडे करावी. त्यामुळे रुग्णांलयांना नियमितपणे  ऑक्सिजन पुरवठा होईल.

            


ज्या गावात 15 पेक्षा जास्त रूग्ण आहेत त्या गावातील निर्बंध अधिक कडक करावेत. सक्तीने जनता कर्फ्यू लागू करा. कोरोना बाधित रूग्णांना शिक्के मारा व त्यांची यादी ग्रामपंचायतींच्या बोर्डावर प्रसिध्द करावी. कोरोना बाधित रूग्ण बाहेर फिरताना आढळल्यास त्यांना विविध शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत त्या ठिकाणी पाठवावे. गावातील शाळा निश्चित करून बाधितांना शाळेत ठेवावे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जे निर्बंध घातले आहेत त्याला नागरिकांनी सहकार्य करावे. निर्बंधांचे कठोर पालन होण्यासाठी पोलीसानींही गस्त वाढवावी. कोरोनाबाधीत रुग्णांनी इतरांना कोरोनाबाधीत करु नये यासाठी स्वत:ची काळजी घेण्याबरोबरच होम आयसोलेशन व्हावे. आणि इतरांना बाधीत होण्यापासून वाचवावे असे अवाहन त्यांनी यावेळी केले.