शेड्याळमध्ये बेकायदा दारू विकणाऱ्याला पकडले

जत,संकेत टाइम्स : शेड्याळ येथील राजेंद्र यमुना तासे,(वय 39) याला बेकायदा चोरून दारू विक्री करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडत तब्बल 41,520 रूपयाचा दारूसाठा जप्त केला.
शेड्याळ येथे राजेन्द्र तासे हा कोरोना संचार बंदी असतानाही चोरून दारू विकत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.त्या आधारे छापा टाकला असता त्यांच्याकडे देशी दारू 24,000 रूपये किंमतीच्या 240 बॉटल,विदेशी दारू मँकडॉवेल्स 9,600 रूपयाच्या 180 मिलीच्या 48 बॉल,बियरच्या 7,920 रूपये किंमतीच्या 36 बॉटल असा एकूण 41,520 रूपये किंमतीचा दारूमाल मिळून आला आहे.त्यांचे विरूध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 ड प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.अच्युत सुर्यंवशी,जाधव,राजू शिरोळकर,कांबळे यांच्या पथकाने हि कारवाई केली.