कुणीकोणूरमध्ये जीवनावश्यक वस्तूचे वाटप

जत,संकेत टाइम्स : कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे मोठ्या प्रमाणात हातावर पोट असणाऱ्या कुंटुंबियांना अडचणी वाढल्या आहेत.त्यातच कुणीकोणूर येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने पुर्णत: गाव बंद ठेवण्यात आले आहे.त्यामुळे अडचणीतील कुंटुबियांना रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी जीवनावश्यक वस्तूचे किटचे ‌वाटप केले.कुणीकोणूर येथे सध्या‌ कोरोना स्थिती बिकट बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर जमदाडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांना मदतीचा हात‌ दिला आहे. भाजीपाला,किराणा साहित्याचे किट वाटण्यात आले.


कुणीकोणूर ता.जत येथे गरजू कुंटुबियांना ‌जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले.