शेतकऱ्यांनी सुधारित जातीचे बियाणे वापरावे ; दिनकर पंतगे

जत,संकेत टाइम्स : जून महिन्यापासून खरीप हंगाम सुरू होत आहे.शेतकऱ्यांनी सुधारित जातीचे बियाणे वापरून पेरणी करावी व खरीप हंगामातील ज्वारी, बाजरी,भुईमूग, सोयाबीन, तूर, मटकी, उडीद, चवळी, इत्यादी पिकांची पेरणी करताना नवीन सुधारित जातीचे बियाणे वापरावीत,त्यासाठी आत्ताच बियाण्यांची मागणी नोंदवावी तसेच जमिनीची आरोग्य पत्रिका तपासली असल्यास त्याच्या नुसारच रासायनिक खतांचा वापर करावा. ही खते वापर करीत असताना सरळ खते किंवा मिक्स खतांचा वापर करावा व घरचे बियाणे वापर करणार असल्यास ज्वारी, बाजरी, मका, इत्यादी बियाण्यांस अझोटोबॅक्टर दोनशे पन्नास ग्राम,दहा किलो बियाण्यास लावून बीज प्रक्रिया करावी, तसेच भुईमूग, सोयाबीन, तूर, उडीद,मटकी, इत्यादी घरचे बियाणे वापर करणार असल्यास प्रति 10 किलो बियाण्यास रायझोबियम या जिवाणूंचा वापर करावा. त्याच्यामुळे 10 ते 15 टक्के उत्पादनात वाढ होते.तसेच बियाण्याची उगवण क्षमता पहावी व मगच नंतर पेरणी करावी,अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी सहाय्यक मंडल कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा,असे आव्हान महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष  
दिनकर पतंगे यांनी केले