सुनेला चुलत सासू, सासऱ्याकडून मारहाण

जत,संकेत टाइम्स : अचनहळ्ळी ता.जत येथे रस्त्यावर दगडे का टाकली म्हणून का विचारले म्हणून चुलत सुनेला सासरा,सासूसह चौघांनी काठीने गंभीर मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी चुलत सासरे महादेव लकाप्पा वाकसे,सासू शुभाबाई वाकसे,दीर प्रकाश वाकसे,जाऊ राणू वाकसे यांच्या विरोधात रुपाली अतुल वाकसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जत पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, रुपाली वाकसे व चुलत सासरे महादेव वाकसे यांच्यात‌ जमिनीच्या वाटणीवरून वाद आहे.महादेव वाकसे यांनी त्यांच्या समाईक‌ रस्त्यावर दगडे टाकली होती.हे दगडे का टाकली म्हणून रुपाली विचारण्यासाठी गेली असता संशयित चौघांनी काठीने गंभीर मारहाण केली आहे. यात रुपालीचा हात मोडला असून उपचार करून त्यांनी जत पोलीसात धाव घेतली आहे.अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.अधिक तपास मिसाळ करत आहेत.