जत तालुका कडकडीत बंद | पोलीसाचा कडक पहारा | तरीही कोरोना बाधित कमी होईनात

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट पसरत असल्यामुळे चिंतेचे सावट निर्माण झाले आहे.जत‌ शहरासह ग्रामीण भागातील काही नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनात आल्याने अखेर 
प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी प्रशासनाने 4 ते‌ 15 मे पर्यत कडकडीत जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.जनता कर्प्यूला पहिल्या दोन दिवसात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.आज तीसरा दिवस आहे.इतके 
करूनही रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही.करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता किराणा दुकानासहीत इतर सर्व दुकाने बंद  व कडकडीत जनता कर्प्यू लागू राहील.या अटी-शर्तीचे पालन न करण्याऱ्या नागरिक, दुकानदार व व्यावसायिक यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग कायदा 1887 व कोविड-19 संदर्भातील शासनाचे नियम व परिपत्रकान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.तसेच तालुक्यातील काही लोकांनी जर वैयक्तिकरित्या खासगी रुग्णालयात जाऊन कोविड-19 ची तपासणी केली असेल आणि ते जर संक्रमित झाले असतील तर त्यांनी आपली आजारासंबंधीची माहिती लपवून न ठेवता स्थानिक आरोग्य उपचार केंद्रात कळवावी.दरम्यान जत शहरात जनता कर्प्यूचा आज‌ तीसरा दिवस आहे.दोन दिवस पोलीसांनी कडक अंमलबजा‌वणी करण्यात येत आहे
विना कारण फिरणाऱ्या नागरिकांना दंड ,