जत‌ तालुक्यातील कोरोना संकट घालविण्यासाठी एकत्रित प्रयत्नाची गरज ; रमेश पाटील

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाची स्थिती बिकट‌ झाली आहे. सध्या‌ कोरोना बाधित व कोरोना होऊ नये म्हणून नागरिकांना शक्य तितकी मदत करण्याची वेळ आहे.त्यामुळे तालुक्यातील नेत्यानी एकमेकावर आरोप पत्यारोप करण्यापेक्षा एकजूटीने तालुक्यातील जनतेला वाचविण्यासाठी प्रयत्न करूयात,असे आवाहन राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांनी केले आहे.पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्याला पालकमंत्री जयंत पाटील यांच्या रुपाने ताकतवान नेतृत्व मिळाले आहे.ते जिल्ह्यात प्रभावी काम करून कोरोनाची दुसरी लाट रोकण्यासाठी प्रयत्न करत आहेत.त्यांच्या माध्यमातून जत तालुक्यात अनेक उपाय योजना,मदत करण्यात येत आहे.आणखीनही त्यांच्या कडे ‌मागणी करून जत तालुक्यातील हे संकट घालविण्यासाठी एकसंघ प्रयत्नाची गरज आहे.तालुक्यातील नेत्यांनी एकमेकांची राजकीय उणी-दुणी काढून संकट वाढविण्यापेक्षा त्यातून बाहेर पडण्यासाठी एकत्रित यावे,तालुक्यात सध्या‌ आरोग्य,महसूल,पोलिस यंत्रणा पुर्ण काम करत आहे.त्यांना लागणारे साहित्य,मदत करण्याची वेळ आहे.त्याशिवाय व्हेंटिलेटर, ऑक्सीजन बेड,औषधे,लस,अपुरा कर्मचारी वर्ग अशा आरोग्याच्या‌ अपुऱ्या सोयीसुविधा वाढविण्याच्या दृष्टिने पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनातून एकझूटीने प्रयत्न करूयात कोरोनाचा मोठा धोका 
तालुक्यात निर्माण झाला आहे,त्यामुळे सर्वांनी कोरोना संकटातून बाहेर पडण्याचे आपल्या परीने उपाययोजना,मदत,नियोजन करावे,असेही आवाहन पाटील यांनी केले.