आवंढी ग्रामस्थांचा निष्काळजीपणा भोवणार

आवंढी संकेत टाइम्स : सध्या कोरोनाच्या संसर्गजन्य रोगाने जगभरात हाहाकार माजवला असून भारतातही गेल्या दिड महिन्यापासून संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात येत आहे.दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून मोठ्या शहरातील कोरोना संसर्ग आता खेड्यापाड्यावर पोहचला आहे.त्या पार्श्वभूमीवर जत‌ तालुक्यातील 15 मे पर्यत जनता कर्प्यू लावण्यात आले आहे. 


मात्र आंवढीत‌‌ याला अपवाद ठरत असून गाव बंद असतानाही नियमांना तिरांजली वाहत गावातील पार कट्ट्यावर नागरिकांचा गप्पाचा फंड रंगत‌ आहे.नागरिक गटागटाने गावातील सार्वजनिक परिसरात बसत आहेत.त्यांना मास्क,सोशल डिस्टसिंगचाही विसर पडल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जत तालुक्यातील आंवढी येथे पहिल्या लाटेत‌ कोरोनाचा मोठा फटका बसला आहे, तरीही सुधारतील ते नागरिक कसले,असा काहीसा प्रकार सध्या घडत आहे.सध्याही गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्या धर्तीवर ग्रामपंचायतीत कडून गाव कडकडीत बंद पाळण्यात आले आहे. मात्र काही बेपर्वार्ह नागरिकांचा विना मास्क वावर गावाची चिंता वाढवत आहे.दुसरीकडे बेकायदा दारू विक्री,दुकानदारां कडून खुलेआम माल देण्याच्या प्रकाराने दक्षता‌ कमिटी करते काय,असा काहीसा सवाल उपस्थित झाला आहे.तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी आंवढीतील या प्रकाराला पायबंद घालावा,अशी मागणी सुज्ञ नागरिकांतून होत आहे.