कोरोना विस्फोट,तरीही डफळापूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची भंटकती

डफळापूर, संकेत टाइम्स : डफळापूर ‌ता.जत‌ येथील वार्ड क्र.1 मधील मांतग व बौध्द समाजातील नागरिकांना महिन्यापासून पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.यांची तात्काळ चौकशी करून पाणी पुरवठा सुरू करावा,अशी मागणी ग्रा.प.सदस्य मुरलीधर शिंगे यांनी केली आहे,त्यांनी तसे निवेदन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकात गुड्डेवार यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे, डफळापूर येथे राष्ट्रिय पेयजल योजनेचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सध्या वार्ड क्र.1 मधिल अतर्गंत पाईपलाईन टाकण्यात येत आहे.त्यामुळे पुर्वी सुरू असणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.सुरू काम तब्बल महिन्याभरा पासून काम अर्धवट सोडण्यात आले आहे.त्यामुळे या वार्डमधील मांतग व बौध्द वस्तीचा पाणीपुरवठा बंद‌ आहे.अनेक वेळा योजनेचे तांत्रिक सल्लागार के.डी.मुल्ला,ठेकेदार कदम यांना सांगण्यात आले आहे.
 मात्र त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.त्यामुळे ऐन कोरोना संसर्ग वाढलेला असताना या वस्तीतील नागरिकांना पाण्यासाठी भंटकती करावी लागत आहे,यांची योग्य ती माहिती घेऊन तात्काळ संबंधित ठेकेदार,तांत्रिक सल्लागार यांचेवर कारवाई करून पाणी पुरवठा सुरू करावा,असे म्हटले आहे.