महाराष्ट्रातून कर्नाटकात‌ प्रवेश बंद

कोंतेबोबलाद : जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्टातील नागरिकांना कर्नाटकात येण्यास बंदी घालण्यात आली असून दोन्ही राज्याच्या सिमेवर कर्नाटक पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे/त्यामुळे दोन्ही राज्यातील दळवळण बंद पडले आहे.त्याशिवाय सीमावर्ती भागातील नातेसंबधावर परिणाम झाला आहे. दोन्ही राज्यातील नागरिक इकडे,तिकडे जाऊ शकत नाहीत.


कोरोनाचा प्रभाव रोकण्यासाठी कर्नाटक सरकारने पाऊल उचलले असून कर्नाटकातील विजापूर येथे महाराष्ट्रातील नागरिकांची मोठी ये-जा करत असतात.त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने पुढील काही दिवस प्रवेश बंदी करण्यात येत आहे. मेडिकल सुविधासाठी मात्र भूमा देण्यात आली आहे.