गोमूत्र पिल्याने कोरानापासून बचाव होतो ; भाजपा आमदारांचा दावा

नवी दिल्ली : एकीकडे कोरोना विषाणूची दुसरी लाट देशात प्रकोप करत आहे.देश,राज्यापर्यत सर्व शक्ती कोरोना रोकण्यात‌ लागली असताना भाजपाचे नेते सातत्याने वेगवेगळी विधाने करून यंत्रणांना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. आता एक युपी मधील भाजपा आमदारांनी नवीन शोध लावत गायीचे गोमूत्र पिल्यानंतर कोरोना विषाणू बरा होतो,असा दावा केला आहे.

युपीमधील बलियामधील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह असे ‌दावा केलेल्या खासदाराचे नाव असून असे विधानाने कोरोनाला रोकणे शक्य‌ आहे का ? सुरेंद्र सिंह यांनी‌ गोमुत्र एक ग्लास थंड पाण्यात घालून पिण्याचा सल्ला लोकांना दिला असून ते स्व:ताही अशा इलाजाने बचावल्याचे म्हटले आहे.