प्रकाश जमदाडे यांनी टिकाकरण्यापेक्षा कोविड सेंटर काढावे ; भूपेंद्र कांबळे

जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुक्याचे‌ आमदार विक्रमसिंह सांवत हे कोरोनापासून नागरिकांना वाचविण्यासाठी प्रभावी काम करत आहेत, तरीही दोनशे रूपयाचे‌ वाटीभर औषध फवारणी करणारे प्रकाश जमदाडे यांनी बेजबाबदार पणे बोलून आमदार सांवत यांच्यावर आरोप करू नयेत, असे आवाहन कॉग्रेसचे युवा नेते तथा‌ नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांनी केले आहे.


त्यांना खरचं तालुक्याची सेवा करायची असलेतर त्यांनी एकादे कोविड सेंटर काढावे,असेही कांबळे म्हणाले.
जत शहरासह तालुक्यात वाढलेल्या कोरोना संसर्ग रोकण्यासाठी आ.सावंत हे जीवाची पर्वा न करता सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांचा प्रत्येक दिवस कोरोना उपाय योजना करण्यात जात आहे.आमदार फंड,जिल्हा,तालुका स्तरावरील विभागाकडून निधी उपलब्ध करून देत,ग्रामीण रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रे,उपकेंद्रे,कोविड सेंटर,सह ग्रामपंचायतीना मदतीसाठी साहित्य पुरविले जात आहे. आमदार सांवत हे स्व:ता गांऊडवर उतरून काम करत आहेत.दुसरीकडे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, तालुकाध्यक्ष सुनिल पवार सह भाजपचे नेते,पदाधिकारी हे प्रत्यक्ष काहीही करत‌ नाहीत.मात्र ते प्रभावी काम करणाऱ्या आ.सावंत यांच्यावर बेताल आरोप करत आहेत. सध्या आरोपापेक्षा आपण काय करू शकतो,ते त्यांनी करावे.
कांबळे म्हणाले, प्रकाश जमदाडे यांनी आमदार सांवत यांच्यावर आरोप करण्यापेक्षा स्व:त कोविड काळात काय काम केले,हे तपासावे त्यांनाही तालुक्यातील नागरिकांची काळजी वाटत असेलतर,त्यांनी आपल्याच कुंटुबातील युवकांना घेऊन वाटीभर औषध फवारणी करण्यापेक्षा तालुक्यात कोविड सेंटर काढावे,सध्या टिका करण्यापेक्षा ते प्रभावी ठरेल असेही कांबळे शेवटी म्हणाले.