करजगीत बेदाणा भिजला,चार लाखाचे नुकसान

करजगी,संकेत टाइम्स : करजगी (ता.जत) येथे वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या बेदाण्याचे सुमारे चार लाखांचे नुकसान झाले आहे.


सलग दोन दिवस करजगी परिसराला अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले.मेघगर्जनेसह तूफान वारे,गारपिठ,पावसाने द्राक्ष,बेदाण्याचे मोठे नुकसान केले आहे.    
नागप्‍पा कळी यांचा शेडवर टाकलेला तीन टन बेदाणा भिजल्याने सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले आहे.विठ्ठल  सिदगोंड रेवी यांचाही 2 टन बेदाणा पावसात भिजला आहे.त्यांचेही दोन लाखाचे नुकसान झाले आहे.नुकसान सच गाव कामगार तलाठी हनुमंत बामणे यांनी पंचनामा केला आहे. शासनाने मदत द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली 


करजगी ता.जत येथे बेदाणा भिजल्याने नुकसान झाले आहे.