जत तालुक्यात नव्या रुग्णाचे द्विशतक,मुत्यूची संख्या वाढली

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात शुक्रवारी कोरोनाच्या नव्या रुग्णाचे द्विशतक पार करत 217 वर पोहचली आहे.तालुक्यातील संख्या यामुळे 5498 वर पोहचली असून 1587 रुग्ण सध्या उपचाराखाली आहे.त्यातील 1391 रुग्णावर होम आयसोलेशन मध्ये आहेत. तर शुक्रवारी तालुक्यातील114 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.तर दुर्देवाने 6 रुग्णाचा उपचारा दरम्यान मुत्यू झाला आहे.तालुक्यातील जत शहर,बिळूर,तिल्याळ,उमराणी,रा.वाडी,डफळापूर,बालगाव,खोजानवाडी,कुडणूर ही गावे चिंताजनक स्थितीत आहेत.त्याशिवाय तालुक्यातील वाढणारी रुग्ण संख्या धोकादायक बनली आहे.सातत्याने परिस्थिती नियत्रंणा बाहेर गेली आहे.नागरिकांनी खबरदारी बाळगण्याची गरज आहे.आजचे जत तालुक्यातील नविन पॉझीटिव्ह रुग्ण 217, (जत 34,वाळेखिंडी 1, खलाटी 2, बिळुर 10,मेढेगिरी 1, उमदी 5, को .बोबलाद 4,वळसंग 2, शेगाव 7, तिल्याळ 8,माडग्याळ 5,जा .बोबलाद 2, सनमडी 4, उमराणी 14, ऊटगी 2, सोन्याळ 2, येळवी 6,बालगाव 7, 
रा.वाडी 7,डफळापुर 11, कोळेगिरी 4, गुगवाड 3, कुलाळवाडी 1, बेळुखी 5,टोणेवाडी 4, कोसारी 5, बनाळी 6, खोजानवाडी 11,शेडयाळ 1, मोरबगी 2, ऊंटवाडी 3,काराजनगी 1, मिरवाड 3, कुणीकोणूर 2, अंतराळ 2 मोटेवाडी 1, शिंगनहळळी 1, करेवाडी को 4, कुडणूर 15, एकुंडी 4, लकडेवाडी 1, बोर्गी खु 1 कोणबगी 2, हळळी 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.