जनता कर्प्यू प्रशासन सज्ज ; प्रांताधिकारी

जत,संकेत टाइम्स : जत शहरात नगरपरिषदेकडून पुकारण्यात आलेल्या जनता कर्प्यू कडकडीत पाळण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.तालुक्यातील अन्य गावांनीही या जनता कर्प्यूमध्ये सामील होत,कोरोनाची चेन तोडण्यासाठी प्रयत्न करावेत,असे आवाहन प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांनी केले.
जत‌ शहरात ता.4 ते ता.15 मे पर्यत असे असणाऱ्या जनता कर्प्यूमध्ये मेडिकल,दवाखाने सुरू राहणार आहेत.अन्य अत्यावश्यक सेवा असणाऱ्या दुध,किराणा,भाजीपाला घरपोच सेवा देण्यात येणार आहे. त्याशिवाय कृषी सेवा केंद्रातून कृषी  साहित्य गोडावून मधून देण्यास मूभा देण्यात आली आहे. अन्य सर्व दुकाने पुढील दहा दिवस कडकडीत बंद राहणार आहेत.त्याशिवाय नागरिकांना  गरजेशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आले आहे.
जत शहरात प्रभाग निहान समित्या तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर दक्षता समित्या नेमण्यात येणार आहेत.त्यांच्याद्वारे नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येतील.कोरोनाचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला असून तो रोकण्यासाठी जनता कर्प्यू हाच मार्ग उरला असल्याने 4 ते 15 मे पर्यत नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहनही आवटे यांनी केले.


शहरासह तालुक्यात नियंत्रणासाठीण पोलीस,महसूल,नगरपरिषद,आरोग्य विभागाची पथके नेमण्यात आली आहेत.विनाकारण फिरणाऱ्या व जनता कर्प्यूचा नियम तोडणाऱ्या दुकानावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर्णत: सहयोग करावा,असेही आवटे म्हणाले.