डफळापूरमध्ये औषध फवारणी

जत,संकेत टाइम्स : डफळापूर ता.जत येथे कोरोना रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर गावात औषध फवारणी करण्यात आली. गेल्या पंधरा दिवसापासून डफळापूरसह परिसराला कोरोनाने विळखा घातला आहे.सातत्याने रुग्ण आढळून येत आहेत.त्यामुळे ग्रामपंचायतीकडून खबरदारी घेण्यात येत आहे. प्रमुख चौकासह रस्ते,कॉलनीत ट्रँक्टरद्वारे औषध फवारणी करत कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव रोकण्यासाठी निर्जंतुकीकरण करण्यात आले.कोरोनाची वाढती परिस्थिती दिवसेंदिवस भिषण होत असून ही साखळी तोडण्यासाठी प्रशासनाबरोबर ग्रामपंचायत गांभीर्यपूर्वक रुग्ण कसे आटोक्यात आणता येतील,या दृष्टीने प्रयत्न करत आहे.नागरिकांच्या  आरोग्याची पुर्णत: काळजी घेत आहोत.कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये,आपल्यासह कुंटुबियाची काळजी घ्यावी,असे आवाहन परशूराम चव्हाण सर यांनी केले आहे. यावेळी ग्रामविकास अधिकारी कुंभार,तलाठी,अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

डफळापूर ता.जत येथे औषध फवारणी करून गाव निर्जतुकीकरण करण्यात आले.