आमदार विक्रमसिंह सावंत यांची अचानक मोरबगीला भेट

भिवर्गी,संकेत टाइम्स : मोरबगी (ता.जत) गाव गुरुवार पासून कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे.दरम्यान सोमवारी
अचानक तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी गावाला भेट देत कोरोना परिस्थिती जाणून घेत तातडीने उपाय योजना करण्याच्या सुचना आरोग,आ विभाग व महसूल प्रशासनाला दिले.उपस्थित लोकप्रतिनिधी,ग्रामस्थांशी संवाद साधला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील उपस्थित होते. आ.सावंत म्हणाले की,तालुक्यातील ग्रामीण भागात दुसऱ्या लाटेत कोरोना फैलाव वाढला आहे.त्यामुळे गावातील ग्रामपंचायत, दक्षता कमिटीने सतर्क राहण्याची गरज आहे. नागरिकांनी बेपर्वार्ह न वागता,प्रशासनाचे नियम काटेकोर पाळावेत,दक्षता हेच कोरोनाला परतवून लावण्याचा पर्याय आहे.गावातील आरोग्य व्यवस्था,लसीकरणाची माहिती यावेळी आमदार सांवत यांनी घेतली.लसीकरण वाढविण्याबाबत सुचनाही केल्या. सिमावर्ती गावांनी मोठी खबरदारी घेण्याची यावेळी गरज आहे,असेही सांवत म्हणाले.
सरपंच कविता मांग,उपसंरपच राजकुमार नंदुर,सीएचओ होनमोरे,पोलीस पाटील श्रीशैल चौगुले,ग्रामसेवक दत्ता माने, तलाठी बाळासाहेब जगताप, ग्राम पंचायत कर्मचारी,कोतवाल चंद्रकांत दंदरगी,आशा वर्कर, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

आमदार विक्रमसिंह सावंत यांनी मोरबगीला भेट देत आरोग्य सुविधेची पाहणी केली.