संख तलावातून भिवर्गी,हळ्ळी,उमदीला पाणी मिळणार ! | जलसंपदा मंत्री जंयत पाटील यांचे आदेश,प्रत्यक्ष कामास सुरूवात

करजगी,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील संख मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. लवकरचं संखसहभिवर्गी,करजगी,बेळोडगी,हळ्ळी, सुसलाद व उमदी या भागात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
गेल्या तीन वर्षापासून तलाव लाभक्षेत्रात चांगला पाऊस पडला आहे.त्यामुळे 15 वर्षांनंतर संपूर्ण तलाव पुर्णक्षमतेने भरला असून, त्यातील पाणी डावा कालव्यामधून सोडले तर शेतीचे पाणी व पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे.सध्या उन्हाळ्यात संखसह भिवर्गी,करजगी,बेळोडगी,हळ्ळी, सुसलाद व उमदी या सर्व लहान मोठ्या पाणी प्रश्न सुटणार आहे.या मागणीसाठी हळ्ळी येथील शेतकऱ्यांनी उपोषण केले होते.त्यानंतर जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांची ॲड.चनांप्पा होर्तिकर,हळ्ळीचे उपसरपंच लोकप्पा नागोंड व शिष्टमंडळ यांनी भेट घेऊन निवेदन दिले होते.यावेळी येत्या आठ दिवसात काम सुरू करण्याची सुचना त्यांचे विशेष कार्य अधिकारी अमोल डफळे यांना दिली होती.त्याप्रमाणे शनिवारी जलसंपदा विभागाच्या मशिनरीच्या साहाय्याने कालव्यात असलेली झाडे झुडुपे,माती काढून संपूर्ण कालवा दुरुस्तीच्या कामाची सुरुवात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रमेश पाटील,उत्तम चव्हाण
यांच्याहस्ते करण्यात आली.जत तालुका हा कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो परंतु सध्या कालव्याच्या माध्यमातून पाणी आल्यास या गावातील शेतीसाठी पिण्यासाठी व,जनावरांसाठी उपयुक्त ठरणार आहे.यावेळी रेवप्पा पट्टणशेट्टी,बाबुराव नागोंड, कल्लाप्पा हलकुडे, सिद्धाराम खवेकर,अरविंद खवेकर,आदी गावातील गावकरी व शेतकरी त्यांच्या सोबत उपस्थित होते.


संख तलावाच्या डाव्या कालव्याच्या कामास सुरूवात करण्यात आली.