प्राथमिक शिक्षक बँकेने केली सभासदांची निराशा ; भारत क्षीरसागर

0



येळवी : प्राथमिक शिक्षक बँकेची सर्व साधारण सभा 21 मार्च  रोजी संपन्न झाली. सदर सभेचे विषय सर्वांसमोर मांडण्यात आले, यावेळी विषय क्र. 11 नुसार सभासदांची कायम ठेव परत करण्याचें मंजूर करण्यात आले खरे परंतु यातील एकाही शिक्षकांना ठेवी परत न मिळाल्याने सदर सभासदांची निराशा दिसून आली. असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी केले. सभासदांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रही असणारे क्षीरसागर यांनी शिक्षक बँकेवर निशाणा साधला.      

         



Rate Card




बँकेचे एकूण कायम सभासद  7411 असे असून हे सभासद कायम ठेव मिळेल या आशेवर असताना संचालक  मंडळ यांनी या निर्णयाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.सध्याचा काळ हा आपत्तकालीन कोव्हिडं 19 चा असून यामुळे सर्वत्र परस्थिती हाताबाहेर गेल्याने सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे. यामुळे जो तो आर्थिक संकटात सापडला आहे.अशा वेळी बँकेने कायम ठेवी परत करून दिलासा देण्याचे सोडून सभासदांच्या जखमनेवर मीठ चोळण्याचे काम संचालक मंडळाने केले आहे.या परस्थितिथीचा गंभीरपणे विचार करून सभासदांना दिलासा द्यावा व कायम ठेवी परत करावीत अशी मागणी बँकेस जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.