जत तालुक्यातील कोरोना रोकण्यासाठी सर्व पक्षीय प्रयत्नाचे आवाहन

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील कोरोनाची महामारी रोकण्यासाठी सर्व पक्षीय आमदार फंड, जिल्हा परिषद, पंचायत समिती, पदाधिकारी यांच्या निधीतून निधी उपलब्ध करत जत शहरातील बचत भवन येथे कोविड सेंटर उभारून ऑक्सीजन प्लँट उभारण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सोशल मिडियावरून त्यासाठी निधी उपलब्ध करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे.
सुनिल पवार म्हणाले,आमदार विक्रमसिंह सावंत,जि.प.सभापती सुनिताताई पवार ,जत पं.स.चे सभापती मनोज जगताप ,उपसभापती विष्णू चव्हाण, सर्व 7 जि.प.सदस्य व 16 पं.स.सदस्य यांना त्यांनी विनंती करत तालुक्याच्या आमदारांना 1 कोटी रूपये कोविडसाठी खर्च करता येतात,तसेच यावर्षी 15 व्या वित्त आयोगांतून प्रत्येक जि.प.सदस्याला प्रत्येकी 16 लाख रूपयांचा निधी (बंधितसाठी 8 लाख रूपये व अबंधितसाठी 8 लाख रूपये) प्राप्त झाला आहे,
तसेच प्रत्येक पं.स.सदस्याला 7 लाख रूपयांचा निधी (बंधितसाठी 3.5 लाख रूपये व अबंधितसाठी 3.5 लाख रूपये) निधी प्राप्त झाला आहे. जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत गुडेवार यांच्याशी चर्चा करून पवार यांनी जि.प.सदस्य 4 लाख,पंचायत समिती सदस्य 2 अशा प्रमाणे 32 व 36 लाख निधी उपलब्ध करण्याचे आवाहन केले आहे.त्याप्रमाणे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या आमदारफंडातून 20 लाख रूपये,असा एकूण 88 लाख रूपयांचा निधी दोन दिवसात उभा करणे शक्य आहे.
तसे सर्वांनी संबधित विभागाला पत्र देऊन निधी खर्चाबाबत कळवावे.
या 88 लाख रूपयांच्या निधीतून सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्या माध्यमातून बचतभवन येथे 30 ऑक्सीजन बेडचे कोव्हीड सेंटर उभे करणे शक्य आहे. यातील सुमारे 65 लाख रूपयांमध्ये एक ऑक्सीजन प्लँट,व उर्वरित 23 लाख रूपयांचे निधीतून कोविड रुग्णासाठी साहित्य खरेदीसाठी करता येईल.
श्री.गुड्डेवार यांनी वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिले आहे.त्याशिवाय दानशूर व्यक्तीकडून निधी संकलन करून जतच्या जनतेला या संकटातून वाचवूया,येथे पक्ष,आप आपसातील मतभेद विसरून एकत्र येऊया असे आवाहन सुनिल पवार यांनी केले आहे.
यावेळी हैद्राबाद येथील सोन्याचांदीचे व्यापारी विनोद रावसाहेब पवार रा.सनमडी यांनी त्यांचे पिताश्री.कै.शहीद रावसाहेब शा.पवार यांच्या स्मृत्तीप्रित्यर्थ दोन लाख रूपयांचा रोख निधी देण्याचा शब्द दिला आहे.त्याशिवाय सोन्याळ गावचे सामाजिक कार्यकर्ते बसवराज मल्लेशप्पा तेली यांनी रोख 51 हजार निधी देण्याचे जाहिर केले आहे.
या नियोजनासाठी आ.विक्रमसिंह सांवत यांनी पुढाकार केले आहे.यासाठी त्यांनी जिल्हा परिषद सभापती,सदस्य,पंचायत समिती सभापती सदस्य,माजी आमदार विलासराव जगताप,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे,तालुकाध्यक्ष रमेश पाटील यांच्या सहीने आज एक सर्वपक्षीय बैठक बोलवावी 
प्रत्येकांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलवावे,यामुळे कोरोना बाधित रुग्णावर तात्काळ उपचार करून मुत्यू संख्या रोकणे शक्य होईल,यासाठी आमदार सांवत, महिला बालकल्याण सभापती सुनिता पवार,पंचायत समिती सभापती मनोज जगताप यांनी पुढाकार घ्यावेत,असेही पवार यांनी आवाहन केले आहे.