सांगली जिल्ह्यातील काळीपिवळी चालकांचे कोरोना लसीकरण करावे ; प्रंशात घोगरे

जत,संकेत टाइम्स : जतसह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या वाहतूकीची  सेवा बजावणाऱ्या सांगली जिल्ह्यातील काळीपिवळी वाहनाच्या चालकांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून कोरोना लस द्यावी,अशी मागणी काळीपिवळी संघटनेचे युवा नेते प्रंशात घोगरे यांनी केली आहे.

पहिल्या,दुसऱ्या लाटेत व्यवसाय पुर्णत; ठप्प झालेला प्रवासी वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यात हाताला काम नसल्याने चालकांच्या कुंटुबियाची उपासमार होत आहे. शासनाने त्यांना मदत करावी,तसेच भविष्यात त्यांच्या व कुंटुबियांच्या सुरक्षेसाठी फ्रंट लाईन वर्कर्स म्हणून कोरोना लसीकरण करावे,असेही घोगरे म्हणाले.