कोरोना लस तालुक्यातील तरूणांनाच प्राधान्याने द्यावी ; विकास साबळे

जत,संकेत टाइम्स : देशाच्या कोरोना ऑनलाइन पोर्टलवर 18 ते 44 वर्षापर्यत कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे,जत तालुक्यात जत,व माडग्याळ येथील लसीकरण केंद्रावर ऑनलाइन बुकिंग केलेल्या तालुक्याबाहेरील तरूणांना लस देण्यात येत आहे,यामुळे तालुक्यातील तरूण लसी करणापासून वचिंत राहत आहेत.त्यामुळे तालुक्यातील केंद्रावर तालुक्यातील तरूणांना प्राधान्य द्यावे,अशी मागणी रिपाइचे जिल्हा उपाध्यक्ष विकास सांबळे यांनी केली आहे.
साबळे म्हणाले,महाराष्ट्र शासनाने मोठ्या मागणीनंतर 18 ते 44 वर्षापर्यत पर्यतच्या तरूणांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील जत व माडग्याळ येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मोठ्या आशेने तालुक्यातील तरूणांनी पहिल्या दिवशी मोठी गर्दी केली आहे. मात्र लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्टर गरजेचे असल्याने तालुक्यातील तरूणांना लस नाकरण्यात आली मात्र ऑनलाइन रजिस्टर केलेल्या तालुक्या बाहेरील तरूणांना लस देण्यात आली आहे. 
यामुळे तालुक्यातील तरूणांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे केंद्र, राज्य,शासनाने तालुक्यातील केंद्रावर त्याच तालुक्यातील तरूणांना लस मिळावी,असे ऑनलाइन पोर्टलवर दुरूस्ती करावी,अशीही मागणी साबळे यांनी केली आहे.