शासकीय कामात अडथळा, दोघाविरोधात गुन्हा दाखल

जत,संकेत टाइम्स : जत येथे महावितरणच्या खलाटी 33 केव्ही लाईनचे काम करू नका म्हणून शासकीय कामात अडथळा दिल्याप्रकरणी हुसेन नदाफ व अनओळखी दोघे रा.नदाफवस्ती जत यांच्या विरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी विलास तायाप्पा दोरकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,जत येथून खलाटीसाठी 33केव्ही लाईन टाकण्याचे काम सुरू आहे.बुधवारी काम सुरू असताना त्या कामाला हुसेन नदाफ व अन्य एका संशयिताने विरोध करत येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम थांबवा म्हणून वाईटवंगाळ शिवीगाळ करून मारहाण करत शासकीय कामात अडथळा आणला आहे. 
याप्रकरणी महावितरणचे कर्मचारी विलास दोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवि कलम 353,332,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस फौजदार आप्पासाहेब कत्ते करत आहेत.