प्रकाशराव जमदाडे वक्तव्य अज्ञानपणाचे ; नाना शिंदे

जत,संकेत टाइम्स : जतचे‌ आमदार विक्रमसिंह सांवत कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून तालुक्यातील जनतेसाठी जागरूकपणे प्रशासनाला बरोबर घेऊन चांगले काम केले आहे,सध्याही करत आहेत,आता राजकारण करण्याची वेळ नसून सर्व पक्षाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे,त्यामुळे आरोप करण्यापेक्षा स्व:ता कोरोनामध्ये काय करता येते ते करावे,असे आवाहन कॉग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय उर्फ नाना शिंदे यांनी केले आहे.   
आमदार सांवत यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काळात आमदार फंडातून,शासन स्तरावरून आणि विक्रम फौंडेशनच्या माध्यमातून आरोग्य विभागाला लागणारे उपकरणे,त्याचबरोबर तालुक्यातील जनतेसाठी अर्सेनिक अल्बम 30 या प्रतिकार शक्तीच्या गोळ्यांचे वाटप केले.मास्क,सॅनीटायझर,थर्मल स्कँनर,पल्स ऑक्सिमीटर यांची वेळोवेळी उपलब्धता करून दिली.
गरीब जनतेला स्व:त व कार्यकर्त्या मार्फत मोफत उदरनिर्वाहाचे साहित्य वाटप केले. तालुक्यात निर्जंतुकीकरण करणेसाठी सोडियम हाय पोक्लोराईडचे वाटप केले.चालू वर्षी देखील विक्रम फौंडशन व श्री.दत्त पतसंस्थेच्या माध्यमातून उमदी व डफळापूर येथे कोव्हीड सेंटर सुरु केले आहे.आमदार फंडातून 1 कोटी रुपयाचा निधी कोरोना महामारीसाठीच्या  उपचारास आवश्यक साहित्य खरेदीसाठी उपलब्ध करून दिला आहे. भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून जत तालुक्यातील कोरोना रुग्णांना आवश्यक  सोयी उपलब्ध करून देत आहेत.
जत तालुक्यातील जनतेचे पालक म्हणून आमदार सांवत यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे.किंबहुना याही पेक्षा आमदार सांवत अतिशय चांगले काम करत आहेत.आरोग्य विभागातील व इतर विभागातील कर्मचार्यांची संख्या कमी आहे.त्याबद्दल सुरुवातीपासून पाठपुरावा चालू आहे.लवकरच तोही प्रश्न सुटणार आहे.आमदार सांवत रोजचे रोज प्रशासनाच्या बरोबरीने ऑक्सिजन पुरवठा असेल रेमडीसिव्हीर इंजेक्शन उपलब्धता असेल याचा पाठपुरावा घेतात.कोरोना महामारीला रोखण्यासाठी प्रशासनाला सक्त सूचना देऊन जनतेलाही त्यांनी आवश्यक खबरदारी घेणेबाबत रोज आवाहन करत आहेत.त्यासाठी रोज आवश्यक सूचना प्रशासन ,पोलीस प्रशासनाला देत आहेत.
निर्जंतुकीकरण फवारणीसाठी,कोरोना संसर्ग रोखणे कामी येणारा खर्च  ग्रामपंचायतींना स्थानिक स्तरावर 15 व्या वित्त आयोगातून खर्च करण्याची सूचना शासनाने दिली आहे.लोक आपण काय करत आहात असे विचारातील या भावनेने केवळ सवंग लोकप्रियतेसाठी प्रकाश जमदाडे यांना या वर्षी जाग आली आहे.टिकाटिप्पणी करण्यापेक्षा तालुक्यातील जनतेसाठी काय करता येईल.याचा विचार त्यांनी करावा व केवळ राजकीय लोकप्रियतेसाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यावर टीका करणे बंद करावे,असेही शिंदे यांनी आवाहन केले.