बोर्गीत वीजबिलासाठी शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तोडला

उमदी,संकेत टाइम्स : बोर्गी ता.जत येथे महावितरणच्या अनागोदी कारभारामुळे अखंडित विज पुरवठ्याचा सामना करावा लागत आहे.गेल्या दोन दिवसापासून पुर्ण बालगाव फिटरचा विज पुरवठा खंडीत केला असून विज बिल भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरू केला जाणार नाही,असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याने ऐन लॉकडाऊनच्या काळात शेतकरी,नागरिकांचे हाल सुरू आहे,तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरू करावा,अन्यथा मास्क,सोशल डिस्टसिंग पाळत उपोषण करू,असा इशारा बेळोंडगी सोसायटीचे चेअरमन सोमनिंग बोरामणी यांनी दिला आहे. 
बोर्गी,बेळोंडगी, बालगाव सह परिसरात विज वितरण कंपनीच्या भोगळ कारभारामुळे शेतकरी,नागरिकांना ऐन लॉकडाऊन, उन्हाळ्याचा दिवसात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.उन्हाचा तडाखा वाढत असल्याने पिके पाण्या अभावी माना टाकत‌ आहेत.त्यांना विज पुरवठा नसल्याने पाणी पाजने मुश्किल झाले आहे.त्याशिवाय जनावरासह पाणी पुरवठ्याला फटका बसला आहे.संबधित अधिकारी,वायरमेनना विचारणा केल्यास बिल भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरू होणार नसल्याचे सांगण्यात आले. लॉकडाऊन मुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीन भर घातली जात आहे. पिके डोळ्या देखत वाळताना पाहावे लागत‌ आहेत.महावितरणने शेतकरी,नागरिकांचे हाल तात्काळ थांबवा अन्यथा आम्हाला लॉकडाऊनमध्ये आंदोलना शिवाय पर्याय नसल्याचे समोर बोरामणी यांनी सांगितले.