सिंगनहळ्ळीत ब्रेक द चेन साठी उपाययोजना
सिंगनहळ्ळी, संकेत टाइम्स : सिंगनहळ्ळी ता.जत येथे कोरोना रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन साठी औषध फवारणी करण्यात आली.कोरोनाचा प्रभाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायत सक्रीय झाली असून ग्राम दक्षता समितीची बैठक घेत गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.
त्याशिवाय मास्क,सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.गावातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी ग्रामपंचायत स्तरावर सर्व प्रकारच्या उपाय योजना करण्यात येत आहेत,नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन संरपच शालन हिप्परकर यांनी केले आहे.


सिंगनहळ्ळी ता.जत येथे औषध फवारणी करण्यात आली आहे.