आंसगीतुर्कमध्ये विज पडून घर जळाले

जत,संकेत टाइम्स : आंसगीतुर्क ता.जत येथील भिमू दऱ्याप्पा दळवाई यांच्या घरावर विज पडून घर जळून खाक झाले.यात दोन लाखाचे नुकसान झाले आहे.
सायकांळी चारच्या सुमारास या परिसरात मेघगर्जनेसह वादळी पावसाने आगमन झाले.या पावसात आंसगी तुर्क पासून दोन किलोमीटर अंतरावर भिमू दळवाई यांच्या घरावर विज कोसळली.त्यात छप्पर वजा घराने पेट घेतला.बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले.सुदैवाने घरातील सर्वजण 
कामा निमित्त बाहेर असल्याने जीवित हानी टळली.आगीत रोख वीस हजार,संसार उपयोगी साहित्य,धान्याची पोती असे दोन लाख रूपयाचे नुकसान झाले.तलाठी डी वाय कांबळे यांनी पंचनामा केला आहे.