येळवी,खैराव,टोणेवाडी,कुणीकोणूरमध्ये औषधे फवारणी

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील दक्षिण भागातील येळवी, खैराव,टोणेवाडी व कुनिकोणूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांच्याकडून औषध फवारणी केली. 
तालुक्यातील येळवी, खैराव,टोणेवाडी व कुणीकोणूर या गावात सध्या कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे धोका वाढला आहे.श्री.जमदाडे यांनी या गावातील कोरोना प्रभाव कमी करण्यासाठी औषध फवारणी करून निर्जूतीकीकरण केले.
त्याच बरोबर तेथील सरपंच,नागरिक यांचेशी संवाद साधत खबरदारी घेण्याबाबत मार्गदर्शन केले.रुग्ण,उपचार,काही अडचणी याबाबत चर्चा केली.तसेच प्रशासनाच्या नियमाचे काटेकोर पणे पालन करावे,  
सध्य स्थितीत आपला,आपल्या कुंटुबियांचा जीव महत्वाचा आहे.त्यामुळे काम नसताना कोणीही घराबाहेर पडू नये,जे बाधित रुग्ण आहेत,त्यांना व त्यांचे परिवारांना आवश्यक ती मदत करा.कोणत्याही अडचणीसाठी माझ्याशी संपर्क करा.आपल्याला हे संकट घालवायचे आहे.त्यामुळे खबरदारीच आपल्याला बचाव करू शकते,असे आवाहनही जमदाडे यांनी केले.
यावेळी,येळवी माजी उपसरपंच मच्छिंद्र खिलारे,खैरावचे सरपंच राजाराम घुटुकडे, पोलीस पाटील राम पाटील,टोणेवाडी सरपंच सौ.कमल घोडके,नितीन टोने,घोडके,कुणीकोनूरचे सरपंच लक्ष्मण पाटील,संजय कांबळे इ.उपस्थित होते.सदरच्या औषध फवारणीसाठी दिवसभर अभय जमदाडे,प्रमोद जमदाडे,प्रसाद जमदाडे,प्रशांत जमदाडे,योगेश भोसले व सुमित कोडग यांनी परिश्रम घेतले.


येळवी,खैराव,टोणेवाडी व कुनिकोणूर मध्ये प्रकाश जमदाडे यांच्याकडून औषध फवारणी करण्यात आली.