पैशाच्या कारणावरून दांपत्यास गंभीर मारहाण

जत,संकेत टाइम्स : जत येथे पैशाच्या कारणावरून दांपत्यास गंभीर मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी घडला आहे.याप्रकरणी रणजित पवार,जमूना रणजित पवार, महमद पवार,(सर्वजण रा.पांढरा बंगला पाठीमागे जत),सलीम जातकर (रा.एमआयडीसी,जत) या चौघा विरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी मनिषा सुनिल रसाळ यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी,मनिषा रसाळ यांनी रणजित पवार यांने घेतलेले 30 हजार रूपये परत मागितल्याच्या कारणावरून मनिषा पती सुनिल रसाळ,सासू रंजना यांना रणजित,जमुना पवार,महमद पवार,व सलीम जातकर यांनी वाईटवंगाळ शिवीगाळ करत काठी,दगड, लोंखडी सळीने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. 
त्याशिवाय जिवे मारण्याची धमकी दिली आहे.

याप्रकरणी मनिषा रसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विरोधात भादविस कलम 326,325,324,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.