शेगावमध्ये ओमसाई प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिर

शेगांव,संकेत टाइम्स : कोरोनाचा संसर्गाची गंभीर परिस्थिती,आणि त्यामध्ये अपुरा पडणारा रक्तपुरवठा असल्याने ओम साई प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले.श्री.साईबाबा यांच्या प्रतिमेच्या‌ पुजनाने रक्तदानास सुरूवात करण्यात आली.शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.यावेळी डॉ.डी.एन.तेली,डॉ.शिवाजी खिलारे,माजी सरपंच रवींद्र पाटील, धोंडीराम माने,ग्रामपंचायत सदस्य विष्णू शिंदे,साहेबराव शिंदे,सत्यजित नाईक,शहाजी खिल्लारे,सुनील देशमुख राजू पट्टणशेट्टी,मिलिंद पाटील,मंगेश सावंत,प्रकाश बोराडे,चंद्रकांत शिंदे,प्रमोद साळे उपस्थित होते.


रेवनील ब्लड बँकेकडून सहकार्य मिळाले.ओम साई प्रतिष्ठान कडून सर्वांना साईबाबाचा फोटो भेट देऊन मनापासून आभार मानण्यात आले.


शेगाव ता.जत येथे ओम साई प्रतिष्ठान कडून रक्तदान शिबिर संपन्न झाले.