सिंगनहळ्ळी येथे सँनिटायझर,मास्कचे वाटप करण्या

सिंगनहळ्ळी, संकेत टाइम्स : सिंगनहळ्ळी ता.जत येथे ग्रामपंचायती कडून सँनिटाईझर,मास्कचे संरपच शालन हिप्परकर यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.गावात कोरोनाचा प्रसार रोकण्यासाठी ग्रामपंचायतीकडून उपाय योजना राबविण्यात येत आहेत. 
त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांना सँनिटायझर व मास्कचे घरोघरी वाटप करण्यात आले.गावात सध्या लॉकडाऊन पाळण्यात येत आहे.औषध फवारणी करून गाव निर्जूतीकरण केले आहे. कोरोनाचा प्रभाव सध्या नियत्रंणात आहे.पुढीही अशी परिस्थिती रहावी,यासाठी ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी.यावेळी पांडुरंग हिप्परकर,सर्व सदस्य,ग्रामसेविका ज्योती कुंभार उपस्थित होत्या.

सिंगनहळ्ळी ता.जत येथे सँनिटायझर,मास्कचे वाटप करण्यात आले.