मराठा आरक्षण मिळेपर्यत पुढेही लढू ; श्रेयस नाईकशेगाव : सर्वोच्च न्यायालयाचा मराठा समाजातील आरक्षण वरील निकाल दुर्दैवी व निराशाजनक असून यामुळे मराठा समाजावरती अन्याय झाला आहे. समाजातील होतकरू व हुशार मुलांचे भविष्य मातीमोल केल्याचे व अंधकारमय करून समाजाची अधोगती करण्याचे षड्यंत्र आहे.

परंतु मराठा समाज आपला न्याय स्वतः मिळवेल व ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी लढा देण्यास सज्ज राहील कोणत्याही समाजाचे नुकसान न करता मराठा आरक्षणासाठी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून जन आंदोलन उभे करू असे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयश शंकर नाईक यांनी सांगितले.