सीमावर्ती गावे कडकडीत बंद
करजगी,संकेत टाइम्स : कोरोना वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करजगीसह परिसरातील गावे लॉकडाऊन करण्यात आली आहेत.तालुक्यात प्रांताधिकारी यांनी जाहीर  केलेल्या जनता कर्प्यूला पुर्व भागातील सीमावर्ती गावातही प्रतिसाद मिळत आहे.
सर्व व्यवसाय कडकडीत बंद ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय विना कारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याशिवाय दुध,मेडिकल, दवाखाने सोशल डिस्टसिंग पाळत सुरू आहेत.कोरोनाला हरवायाचे आहे.नागरिकांनी घरातच राहून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे,असे आवाहन संरपच साहेबपाशा बिराजदार व उपसंरपच साबू बालगाव यांनी केले आहे.

करजगी ता.जत येथे जनता कर्प्यूच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.