लॉकडाऊन काळात मोफत स्वस्तधान्य अंगठा रजिस्टरने मिळणार

जत : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण राज्यात काही कालावधी करीता‌लॉकडाऊन घोषित केला असल्याने संचारबंदीच्या काळात जिवनावश्यक सेवाचा भाग म्हणून महाराष्ट्र शासनाकडील नियमीत स्वरुपातील स्वस्त दरातील धान्य हे रास्त भाव धान्य दुकानदारांमार्फत मोफत स्वरुपात देणेचे आदेश आहेत. त्यानुसार माहे मे 2021 करीता तालुकेतील अन्नसुरक्षा व अंत्योदय लाभार्थीना ऑनलाईन प्रणालीव्दारे पॉस मशिन वरुन रास्त भाव धान्य दुकानदाराच्या अंगठा रजिस्टरने मोफत धान्य वितरीत केले जाणार आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचे पार्श्वभुमीवर संसर्ग रोखणेसाठी शासनाचा निर्णय असून सदरचे धान्य हे नियमीत प्रमाणानुसारच प्रति माणसी गहु 3 व तांदुळ 2 असे एकूण 5 किलो अन्नसुरक्षा लाभार्थी यांना तर अंत्योदय लाभार्थी कार्डधारकांना नियमीत प्रमाणानुसार गहू 25 व तांदुळ 10 असे प्रति कार्डधारकास 35 किलो धान्य वितरण केले जाणार आहे.याशिवाय केंद्र शासनाकडील पंतप्रधान गरीब कुटुंब कल्याण योजनेव्दारे मागिल वर्षी प्रमाणे या वर्षी माहे मे 2021 करीता अन्नसुरक्षा व अंत्योदय लाभार्थीना ऑनलाईन प्रणालीव्दारे पॉस मशिन वरुन रास्त भाव धान्य दुकानदाराच्या अंगठा रजिस्टरने प्रति मानसी गहु 3 किलो व तांदुळ 2 किलो असे एकूण 5 किलो मोफत धान्य वितरीत केले जाणार आहे.त्यामुळे एकुण एकंदर अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थी यांना प्रति मानसी 10 किलो धान्य तर अंत्योदय लाभार्थी यांना प्रति कार्याप्रमाणे नियमितचे 35 किलो व पीएमजीकेवायचे प्रति मानसी 5 किलो असे धान्य माहे मे 2021 करीता वितरीत केले जाणार आहे.सदर योजनेचा लाभ जत तालुकेतील 177 दुकानदारांमार्फत वितरीत केला जात 


असून जे लाभार्थी अन्नसुरक्षा व अंत्योदय योजनेतील आहेत त्यांनाच सदरचा स्वस्त व मोफत धान्य लाभ वितरीत करणेत येणार आहे.तरी तालुक्यातील योजनापात्र लाभार्थी यांनी आपले गावातील रा.भा.दुकानदारांकडून चे अंगठा रजिस्टरने इपॉस मशिन व्दारे शासन नियमानुसार मुदतीत धान्य प्राप्त करुन घ्यावे. सदरचे धान्य लॉकडाऊन नियमानुसार सकाळी 7 ते 11 या वेळेत दुकानदाराकडून प्राप्त करुन घ्यावे. या कामी कुणीही दुकानाजवळ गर्दी करु नये. सोशल डिस्टंन्सींग नियमाचे पालन करावे. मास्कचा वापर करावा. काही तक्रार असलेस स्थानिक ग्रामदक्षता समिती यांचेकडे संपर्क साधावा. असे अवाहन जत तहसिलदार श्री सचिन पाटील यांनी पत्रकाव्दारे केले आहे.