सिंगनहळ्ळी, जतेत वाळू तस्करांना महसूलचा दणका | तीन ट्रँक्टर जप्त

0



जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात वाढलेल्या वाळू तस्करीवर महसूलच्या पथकाने छापा टाकत दोन टँक्टर पकडले.जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट सुरू असतानाही वाळू तस्करी सुरू आहे. यांची माहिती महसूलच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.





त्याआधारे तहसीलदार सचिन पाटील यांच्या पथकाने सिंगनहळ्ळी येथे दादा हिप्परकर,तर जत येथे सागर माळी यांच्या मालकीचे दोन ट्रँक्टर वाळू भरताना आढळून आल्याने पकडले.त्यांच्या कारवाई प्रस्तावित केली आहे.जत तालुक्यात अनेक जण राजकीय झूल पांघरून वाळू तस्करी करत आहेत.






काही अधिकाऱ्यांच्या बरोबर लगट करून वाळू तस्करीत गुंतल्याचे सातत्याने समोर येत आहे. अशा झारीतील शुक्रचार्यावर महसूल पथकांने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

मंडल अधिकारी भरत काळे,तलाठी निखिल पाटील,रविंद्र वालकोळी,सुभाष कोळी यांच्या पथकाने कारवाई केली.


Rate Card





पडद्याआडच्या झारीतील शुक्रचार्यावर आता नजर


जत तालुक्यात कोरोना लॉकडाऊनचा फायदा घेत‌ काही झारीतील शुक्रचार्य या वाळू तस्करीत गुंतले आहेत.त्यांच्यावर आता महसूलच्या पथकाकडून नजर ठेवली जाणार असून अशा तस्करांना यापुढे मुशक्या आवळल्या जाणार आहेत.



जत‌च्या महसूल पथकांने पकडलेले ट्रँक्टर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.