मोरबगीत रुग्ण वाढताच कडकडीत बंद

भिवर्गी,संकेत टाइम्स; मोरबगी(ता.जत) येथे कोरोना रुग्ण आढळून आल्याने गाव गुरूवारपासून लॉकडाऊन केले आहे.  रुग्ण आढळून आलेल्या 1 किलोमीटर त्रिजेच्या परिसरात कंटेनमेट झोन म्हणून घोषित केला आहे.
महाराष्ट्र कर्नाटक सिमेवरील असणारे मोरबगी गेल्या पंधवड्यात एकही रुग्ण नव्हता मात्र चार दिवसापुर्वी नवे पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने ग्रामपंचायती कडून खबरदारी घेण्यात येत आहे.कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून गाव बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गावातील चौक,रस्ते‌ निर्मनुष्य झाले आहेत. नागरिकांना गावात विनाकारण फिरण्यास मज्जाव करण्यात येत आहे.
उपसरपंच राजकुमार नंदुर म्हणाले की, गावात कोरोना रुग्ण सापडल्याने संसर्ग वाढू नये यांची खबरदारी घेतली आहे.गावात जनता कर्प्यू घोषित केला आहे.शिवाय रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील एक किलोमीटर अंतर परिसर कंन्टेटमेट झोन केला आहे.आरोग्य विभाग,ग्रामपंचायतीकडून सर्वप्रकारे उपाययोजना करत आहोत.नागरिकांनी घरात राहून सहकार्य करावे,असे‌ आवाहनही नंदुर यांनी केले आहे.सरपंच कविता मांग,भीमराव कांबळे,  शिवानंद परिठ,मल्लिकार्जुन मठ, तिप्पांना बिरादार,परमेश्वर खरात, चंद्रकांत दंदरगी,करबसू बगली,संतोष पाटील,हणमंत नांदूर,शिद्दंना बिरादार,शरणाप्पा बिरादार, प्रशांत सोनकनाली,मलकप्पा बिरादार आणि आशा वर्कर निर्मला करकल,पद्मावती दंदरगी,आदी कष्ठ घेत आहेत.

मोरबगीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.