जतेत नियमांना तिलांजली देत नागरिक रस्त्यावर

जत : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवीत असताना नागरिक मात्र बेजबाबदारपणे वागत असल्याचे चित्र जत शहरात दिसत आहे.मंगळवार पासून नगरपरिषदेने जनता कर्प्यूची घोषणा करूनही नागरिक रस्त्यावर मुक्तपणे फिरत असल्याने पोलीस कर्मचारीही त्रस्त झाले आहेत. 
त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आजपासून आठ दिवसाचा लॉकडाऊनचा निर्णय घेतला घेतला आहे.त्याअगोदर मंगळवार पासून नगरपरिषदेकडून जनता कर्प्यू लावला आहे.या काळात दूध व कृषी संबंधित दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली असली तरी अनेकजण विनाकारण रस्त्यांवर फिरत आहेत. 
पोलीस प्रशासन अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत असले तरीही काही नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. शहरातील गर्दी टाळण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर लाकडी बॅरिकेड उभारण्यात आले आहेत. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवरील गर्दी टळण्यास मदत झाली.मोठ्या प्रमाणात विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसण्यास मदत झाली. काही नागरिक तर मास्कही वापरत नसल्याने कोरोना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
पोलीसांनी काहीकाळ सौम्य लाठीचार 


जत शहरात अनेकवेळा सांगूनही काही दुचाकी स्वार ऐकत नसल्याचे लक्षात येताच जत पोलीसाकडून शहरातील पेट्रोल पंप,व सार्वजनिक परिसरात फिरणाऱ्या नागरिकांना लाठीचा प्रसाद दिला.


जत शहरात मंगळवारी नागरिकांचा रस्त्यावर असा वावर होता.