कोरोना रुग्णांचे विलगीकरणाची जबाबदारी दक्षता समितीची ; प्रांताधिकारी

जत,संकेत टाइम्स : गावात विनामास्क, विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करावी.कोरोना रुग्णांचे विलगीकरण करण्याची जबाबदारी दक्षता समितीची आहे.रुग्णाच्या घराजवळ पत्रा लावून परिसर सील करावा. संपर्कातील व्यक्तीना होम क्वॉरण्टाइन करावे.ग्रामदक्षता समितीची दररोज बैठक व्हावी, असे आदेश प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी दिले.करावी.कोरोना संख (ता.जत) येथे ग्रामदक्षता समिती, खासगी डॉक्टर यांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. प्रांताधिकारी आवटे म्हणाले, संख येथील खासगी डॉक्टरांनी कोविड रुग्णांवर उपचार करण्याच्या तक्रार येत आहेत.खासगी दवाखान्यात कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड तपासणी करण्याच्या सुचना द्याव्यात.कोविड रुग्णावर उपचार करून इतरांना धोका वाढवू नये असे आवाहन ही प्रांताधिकारी यांनी केले.