जत तालुक्यातील लसीकरण वाढवा ; दिनकर पंतगे

जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून दररोज दोनशेवर नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मोठा धोका वाढला आहे. या परिस्थितीत सध्या कोरोना वरील लसच प्रभावी ठरत आहे. त्यामुळे जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव रोकण्यासाठी लसीकरणाची गती वाढवावी.त्यासाठी जिल्हा   प्रशासनाकडून तालुक्याला जास्तीत जास्त लसी उपलब्ध व्हावेत यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.
जत तालुक्याचा विस्तार मोठा आहे,ग्रामीण दुर्लक्षीत भाग‌ असल्याने लसीबाबत सांशकता आहे.आम्ही लस घ्या,असे आवाहन करत आहोत.प्रशासनाकडून ही जागृत्ती करावी,केंद्रे वाढवावीत, जत तालुक्याला वाचविण्यासाठी लसीकरण पर्याय उरला आहे, असेही पंतगे म्हणाले.