गुळवंचीत कोरोनाचा विस्फोट होऊनही आरोग्य विभाग कोमात

जत प्रतिनिधी : तालुक्यातील 1900 लोकसंख्या असलेल्या गुळवंची गावात कोरोना रुग्णांची संख्या पन्नासवर गेली असतानाही आरोग्य,महसूल प्रशासनातले अधिकाऱ्यांनी या गावाकडे पाठ फिरवली आहे.अशा दुर्लक्षामुळे कोरोना बाधित रुग्ण सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याने कोरोनाचा विस्फोट होणार असल्याचे निश्चित झाले आहे, पुर्ण गाव कोरोना बाधित झाल्यावर आरोग्य,महसूल विभाग जागा होणार काय असा संतप्त सवाल युवा कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी व्यक्त केला आहे.गुळंवची एवढ्या‌ मोठ्या संख्येने रुग्ण आढळून असताना बेपर्वार्ह पणाचा कळस करत गावात नेमणूकीस असणारे  समुदाय अधिकारी यांचे नातेवाईक खाजगी डॉक्टर गावातच घरोघरी तपासणी करून उपचार करत असल्याने रुग्ण संख्या वाढणार आहे.कोरोनाचा वाढलेला हा प्रभाव रोकण्यासाठी बाधित रुग्णांचे कडक होमआयसोलेशन व गावात औषध फवारणी करण्याची गरज आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूद्दी यांनी आढावा बैठकीत तालुक्यात गंभीर परस्थिती नाही असे सांगत आरोग्य विभागातील कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले आहे.

तालुक्यातील आरेग्य‌ विभागावर कोणतेही नियंत्रण नाही आणि कामचुकार समुदाय अधिकारी अनुपस्थितीत राहत असतानाही,त्यांना पाठीशी घालण्यामागचे गौडबंगाल काय?
दररोज निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत.अजून किती जीव गेल्यावर आरोग्य विभागाचा कारभार‌ सुधारणार आहे? असा सवाल विक्रम ढोणे यांनी केला आहे.


जत तालुक्यात गंभीर परस्थिती नाही म्हणणाऱ्या जितेंद्र डूडी यांनी गांधारीच्या  भूमिकेतून बाहेर पडावे,तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्र व उपकेंद्रला भेटी द्याव्यात तालुक्यात जास्तीत जास्त ऑक्सिजन बेड उपलब्ध करावेत कोरोनासाठी आवश्यक असणाऱ्या औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध करावीत,कसा आरोग्य विभागाचा कारभार‌ सुरू आहे.यांची पाहणी करावी,अशी मागणीही ढोणे यांनी केली आहे.