मुंचडीत सर्पदंशाने महिलेचा‌ मुत्यू

जत,संकेत टाइम्स : मुंचडी ता.जत‌ येथील महिलेचा‌ संर्पदंश झाल्याने मुत्यू झाला.कांचन सतिश पाटील (वय‌ 32,रा.मुंचडी)असे महिलेचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, रविवारी सायकांळच्या दरम्यान कांचन या‌ बलिममधून कडबा काढत असताना संर्पाने त्यांच्या बोटाला दंश केला.त्यांच्या आवाजाने नातेवाईक तिकडे धावले,त्यांनी कांचन यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले मात्र तोपर्यत त्याचा मुत्यू झाला.ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी जत‌ पोलीसात वर्दी दिली आहे.सध्या वादळी पावसामुळे विषारी संर्प दंश होण्याची भिती असते,त्यामुळे वैरण काढणे,शेती कामे करताना खबरदारी घ्यावी,असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.