दिलासादायक | शेगांवमध्ये शेर ए टिप्पू सुलतान संघटनेकडून सॅनिटाइजर फवारणी

शेगांव,संकेत टाइम्स : शेगांव (ता.जत)मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रविवारी सॅनिटाइजर फवारणी करण्यात आली.
शेगावमध्ये गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता.त्यापार्श्वभूमीवर शेर ए टिप्पू सुलतान या सामाजिक संघटनेने गावातील विषाणू मुक्तीसाठी निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध‌ फवारणी केली.नागरीकांच्या आरोग्य रक्षणसाठी कोरोना मुक्त वातावरण होण्यासाठी सोडीयम हायड्रोक्लोराईट द्रावणाने गावातील सर्वाजनिक परिसर,रस्ते,कार्यालयांचा परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला. 
कोरोना विषाणूजन्य आजार असुन श्वसन रोग आहे,कोरोनाचा विषाणू बराच काळ टिकून राहतो.त्यामुळे अशा दुषित पॄष्ठभागाशी थेट संपर्क आल्यास आजार संक्रमित होऊ शकतो,त्यामुळे या विषाणूचा नायनाट करण्यासाठी जंतुनाशक वापर करणे,सर्वात परिणाकारक आहे.या उपायामुळे संक्रमण रोकणे शक्य झाले आहे.टिप्पू सुलतान संघटनेचा हा उपक्रम सामाजिक हित जपणारा आहे,ग्रामपंचायती बरोबर सामाजिक संघटनानी आता गावाच्या सुरक्षेसाठी पुढे येण्याची गरज आहे,असे मत दत्तात्रय निकम सर यांनी व्यक्त केले. 
यावेळी सरपंच महादेव माने, उपसरपंच सचिन बोराडे, संजय पाटील, दत्तात्रय निकम सर, अस्लम मुजावर, मौजिद मुजावर, शफिक मुजावर, समिर मुजावर, मुहम्मद अली मुजावर, साहिल मुलाणी, सुरज मुजावर, आशिफ मुजावर, यांनी सहकार्य केले.

शेगांवमध्ये शेर ए टिप्पू सुलतान संघटनेकडून सॅनिटाइजर फवारणी करण्यात आली.