कोरोना योध्दा आशाना संरक्षण पुरवा : पालकमंत्री जयंत पाटील यांचे झटक्यात डिवायएसपींना आदेश

डफळापूर, संकेत टाइम्स : जतसह सांगली जिल्ह्यात कोरोना दुसऱ्या लाटेत प्रभावी काम करत असलेल्या आंशाना कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे सांगितले म्हणून स्थानिक गावगुंडाकडून दमकाविण्याचे प्रकार घडले आहेत.त्याबाबतचे डफळापूर दौऱ्यावर असलेले पालकमंत्री जयंत पाटील यांना कॉ.हणमंत कोळी व कॉ.मिना कोळी यांनी निवेदन देताच,तेथेच उपस्थित असलेले डिवायएसपी रत्नाकर नवले यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले.
यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत,पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण उपस्थित होते.


कोरोना काळात जिव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा वर्कर्स यांनी कोरोना रुग्णाची तपासणी करताना स्थानिक गावगुंडाकडून धमकाविण्याचे प्रकार डफळापूर व साळमळेवाडीत घडले आहेत.स्थानिक असणाऱ्या आंशा पुढे अडचणी नकोत,म्हणून असे प्रकार समोर आणत नाहीत.मात्र यांचा गैर फायदा घेत गावगुंडाकडून सातत्याने असे प्रकार घडत आहेत.त्या शिवाय जिल्ह्यातही वारवांर अशा घटना घडत आहेत.कोरोना रोकण्यात प्रभावी काम करणाऱ्या आशां बाबत अशा वागणूकीचा निषेध करत पालकमंत्री जयंत पाटील यांनी एका झटक्यात डिवायएसपी यांना माहिती घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
आशांना संरक्षण द्यावे,या मागणीचे निवेदन पालकमंत्री जयंत पाटील यांना निवेदन देताना कॉ.हणंमत कोळी,कॉ.मिना कोळी आदी