डफळापूर येथे शासनाकडून कोविड रुग्णालय उभारावे ; प्रकाशराव जमदाडे

जत,संकेत टाइम्स : प्रशासनाकडून कागदी घोडे नाचवून जतची कोरोना स्थिती हातात असल्याची परिस्थिती रंगविली जात आहे.मात्र त्यापेक्षा धक्कादायक‌ स्थिती जत‌ तालुक्याची झाली असून जत शहरासह स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा नाहीत,कोणतेही वरिष्ठ अधिकारी जबाबदारी घेत नाहीत,त्यामुळे तालुक्यातील दररोज 2-3 रुग्णाचा मुत्यू होत आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे.तालुक्यातील पावनेदोन लाख लोकांची सुरक्षिता महत्वाची असून आपल्या स्तरावरून कारवाई व्हावी,जत‌ 
पश्चिम भागातील गावासाठी ऑक्सीजन, व्हेटिलेंटर,प्रशिक्षित डॉक्टर्स,नर्सेस असलेले कोविड रुग्णालय शासनाकडून उभारावे,
अशी मागणी रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
तालुक्यात जत ग्रामीण रुग्णालय एकमेव शासकीय रुग्णालय कार्यरत आहे.तेथे 25 बेड आहेत.पंरतू एकही व्हेटिलेंटर नाही,गत जूनमध्ये शासनाने रुग्णासाठी दिलेले 5 व्हेंटिलेटर गेले कोठे यांची माहिती प्रशासनातील संबधित अधिकाऱ्यांना नाही.रुग्णांचे जीव जात‌ असतानाही तालुका प्रशासनाला रेमीडेसीवर इंजेक्शन उपलब्ध करता येत नाहीत,नेमका तालुक्याला या इंजेक्शनचा किती साठा आहे,यांची माहितीही संबधित अधिकाऱ्यांना नाही.रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत असतानही बेडची सुविधा नसल्याने ग्रामीण रुग्णालयात खुर्चीवर,व्हरांड्यात रुग्णांना ऑक्सीजन लावावा लागत आहे. माडग्याळ, जत येथील रुग्णालयाचे वर्ग 1 व 2 ची पदे रिक्त आहेत.51 कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहे,त्यापैंकी 24 रिक्त आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्राना 305 पदापैंकी 123 पदे रिक्त आहेत.संख आरोग्य केंद्राला 108 रुग्णवाहिकेचा अपघात‌ झाल्यापासून उपलब्ध नाही.सर्वात मोठ्या असलेल्या जत नगरपरिषदेकडून कोविड रुग्णालय उभारण्याची गरज आहे.मात्र अंतर्गत बंडाळीमुळे शहरात कोरोनाचा विस्फोट होण्यापर्यत नगरपरिषदेला वाट पाहावी लागत आहे. माडग्याळ येथे 50 बेडचे कोविड रुग्णालय तात्काळ सुरू करावे.डफळापूर येथे आयसोलेशन नव्हे तर ऑक्सीजन, व्हेटिलेंटर असलेले सुसज्ज 50 बेडचे‌ शासनाकडून रुग्णालय उभारावे, तेथे तज्ञ डॉक्टरांची टिम नेमावी.जि.प.व पं.स.सदस्यांनी स्वीयनिधीतून ऑक्सीजन, व्हेंटिलेटर,बेडची खरेदी करून केंद्रांना द्यावी.प्रत्येक आरोग्य केंद्रांना 108 रुग्णवाहिका देण्यात यावी,प्रशासनाकडून रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ बंद करावा.वस्तूस्थिती मांडून वरिष्ठ विभागाकडून साहित्य उपलब्ध करून घ्यावे,असेही जमदाडे यांनी आवाहन केले आहे. निवेदानाच्या प्रती पालकमंत्री जयंत पाटील, खा.संजयकाका पाटील,जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.