येरळदरीत अवैध दारू वाहतूक करणाऱ्याला पकडले

जत,संकेत टाइम्स : कोरोना लॉकडाऊन असतानाही अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी बसर्गी येथील एकाला शनिवारी मध्यरात्री पोलीसाच्या नाईट राऊंडच्या पथकाने ताब्यात घेत‌ 50,250 रुपयाचा‌ मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पिरगोंडा निंगाप्पा कांबळे (वय 21,रा.बसरगी) याला ताब्यात घेत कारवाई केली आहे.पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, जत तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची नाकाबंदी कडक केली आहे.दरम्यान नाईट रांऊडच्या‌ पथकाला जतहून बसरगी येथील एकजण दुचाकीवरून बेकायदा दारू घेऊन येत असल्याची खबऱ्याकडून बातमी मिळाली. त्याआधारे पथकाने येळदरी बसस्थानका जवळ सापळा लावला.त्यात पिरगोंडा कांबळे हा जतहून दुचाकी क्र.10,बीवाय 8422 या दुचाकी वरून बसरगीकडे जात होता.त्याला थांबवून पोत्यात काय आहे पाहिले असता, 35,250 रूपयाच्या‌ विदेशी कंपनीचंया मँकडॉल नं.1 180 मीली दारूच्या 235 सिलबंद बॉटल आढळून आल्या.(त्याची बाजार भावाप्रमाणे प्रत्येकी  150 रूपये किंमत आहे.)त्याच बरोबर 15,000 रूपयाची दुचाकी असा 50,250 रूपयाचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.